जिओने आणला जबरदस्त रिचार्ज प्लॅन!! फुकटात पाहता येणार 13 OTT प्लॅटफॉर्म

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रिलायन्स जिओ (Reliance jio) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन प्लॅन्स आखत असते. या नव्या प्लॅन्सचा ग्राहकांना फायदा देखील होताना दिसतो. त्यामुळेच आता पुन्हा एकदा जिओनी आपल्या ग्राहकांसाठी रिचार्जवर धमाकेदार ऑफर आणली आहे. तुम्हाला जर वेगवान स्पीडमध्ये इंटरनेट हवे असेल तर तुम्ही नक्कीच जिओ किंवा जिओ एअर फायबरचा प्लॅनचा लाभ घेऊ शकता. या प्लॅन्समध्ये तुम्हाला फक्त स्पीडस नाही तर इतर अनेक ऑफर्स देखील उपलब्ध होतील.

जिओ एअर फायबर प्लॅनची माहिती

599 रुपयांपासून जिओचा एअर फायबर (Jio Air Fiber) प्लॅन सुरू होत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना हाय स्पीड डेटासह ओटीटीच्या ॲपचे फ्रीमध्ये सबस्क्रीप्शन देखील देण्यात येत आहे. 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठीची वैधता राहील. याबरोबर कंपनी आपल्याला 1000 जीबी डेटा उपलब्ध करून देईल. खास म्हणजे, या प्लॅनमध्ये दिवसाला डेटा मर्यादा नसेल. सर्व ग्राहकांना हा प्लॅन 30mbps च्या स्पीडने मिळेल. मात्र हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागेल. यामुळे तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागेल.

OTT Subscription

महत्त्वाचे म्हणजे, जिओ कंपनी या प्लॅनबरोबर तुम्हाला पोस्ट पेड आणि ब्रॉडबँड योजना ही ऑफर करत आहे. खरे तर ग्राहकांना अधिक सुविधा पुरवण्याच्या हेतूने जिओ कंपनीने जिओ फायबर लॉन्च केले आहे. या फायबरमध्ये अनेक योजना कंपनी ग्राहकांना देत आहे. आणखीन खास गोष्ट म्हणजे, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 13 ओटीटी ॲप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. ज्यामध्ये Disney + Hotstar, Voot Select, SonyLIV, ZEE5, Voot Kids, Discovery +, Sun NXT, Hoichoi, Universal +, Lionsgate play, ALT Balaji, Eros Now, ShemarooMe, Jio Cinema या सर्व प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.