Recharge Plans : ‘या’ कंपन्यांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans : टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आदेशानंतर जवळपास सर्व टेलिकॉम कंपन्यांकडून 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले प्री-पेड प्लॅन सुरू करण्यात आले आहेत. अशातच आता Jio, Airtel आणि Vi ने देखील 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे काही नवीन प्री-पेड रिचार्ज प्लॅन सुरु केले आहेत. ज्यामध्ये भरपूर डेटा आणि जास्त व्हॅलिडिटी मिळेल. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Bharti Airtel ARPU Jumps to Rs 190 in Q2 FY23, Net Profit at Rs 2145 Crore

Airtel चा प्लॅन

Airtel ने 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला अलीकडेच 199 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये एकूण 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएसची सुविधा मिळेल. तसेच एअरटेलच्या आणखी एका 319 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतील. 31 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनसोबत अपोलो 24/7 सर्कल, विंक म्युझिक आणि फ्री हॅलोट्यून्स देखील उपलब्ध आहेत. याचबरोबर, एअरटेलच्या 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत 25 जीबी डेटा, डेली 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. Recharge Plans

Vodafone Idea Quietly Removes Multiple Prepaid Plans

Vi चा प्लॅन

Vi कडे 327 रुपये आणि 377 रुपये किंमतीचे 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले दोन प्री-पेड प्लॅन आहेत. यातील 327 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 25GB डेटा, डेली 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. आता 377 रुपयांच्या दुसर्‍या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 28 जीबी डेटा, डेली 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. ज्याची व्हॅलिडिटी 31 दिवस असेल. Recharge Plans

Jio Plan: ಇನ್ಮುಂದೆ Disney+Hotstarನಲ್ಲೇ ಕ್ರಿಕೆಟ್ ನೋಡಬೇಕು, ಇದಕ್ಕಾಗಿ Jioದಿಂದ 3  ತಿಂಗಳ ಉಚಿತ ಪ್ಲಾನ್

Jio चा प्लॅन

जिओच्या 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास, जिओकडून 296 रुपयांचा प्लॅन देण्यात येतो आहे. ज्यामध्ये एका महिन्याच्या व्हॅलिडिटी सहीत 25GB डेटा मिळेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसची सुविधा देखील मिळेल. त्याचप्रमाणे जिओकडून 181 रुपयांचा प्लॅन देण्यात येतो आहे. जो वर्क फ्रॉम होम कॅटेगरीमध्ये मिळेल. हा प्लॅन खास जास्त डेटाची गरज असणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये 30 GB डेटा मिळेल. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा मेसेजिंगची सुविधा मिळणार नाही. Recharge Plans

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता