सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाने चालू वर्षातील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल ७४२ जण बाधित तर ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात नवनवीन रेकॉर्ड निर्माण होऊ लागले आहेत. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ७४२ असा बाधितांचा आकडा आलेला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा ६६, ८०५ झाला. तर जिल्ह्यात एकूण ६०,३६१ बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १९१० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात ३७९२ उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा