बापरे ! देशात एका दिवसात आढळले रेकॉर्डब्रेक 3 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. एका दिवसात देशात तब्बल ३ लाख 14 हजार 835 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील रुग्ण वाढीची ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. तर मागील 24 तासात 2,104 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णामुळे देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी १ कोटी 59 लाख 30 हजार 965 इतकी झाली आहे. मागील 24 तासात देशात १ लाख 77 हजार 841 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 आहे .

 

आतापर्यंत देशात कोरोनामुळे एक लाख 84 हजार 657 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर सध्या देशात 22 लाख 91 हजार 428 हजारांवर कोरोना वरील उपचार विविध रुग्णालयात सुरू आहेत. देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण केले जाणार आहे. देशात सध्या 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 जणांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Comment