Thursday, March 23, 2023

प्राध्यापक भरती करा अन्यथा सामूहिक आत्मदहन करू

- Advertisement -

औरंगाबाद | नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर स्मरण आंदोलन करण्यात आले. सरकारने लवकरात लवकर प्राध्यापक भरती करावी अन्यथा सामूहिक आत्महत्या करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करावी, केंद्र शासनाचे यूजीसीच्या निर्देशानुसार प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 लागू करून विद्यापीठ व महाविद्यालय म्हणून प्राध्यापक भरती करावी, प्रचलित सीएसबीचे धोरण त्वरित बंद करून शंभर टक्के प्राध्यापक भरती होईपर्यंत समान काम वेतन तत्वावर सर्व सेवा शर्ती व अटीसह नियुक्ती करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात महाविद्यालय बंद असल्यामुळे सीएचबीवर काम करणाऱ्या प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून सरकारने लवकरात लवकर प्राध्यापक भरती करावी. अन्यथा येत्या 9 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला.

- Advertisement -

या आंदोलनात रमेश वाघमारे, अमोल म्हस्के, विकास गवळी, ईश्वर मलेकर, स्वप्नील बोधने, संतोष जाधव, सिंधू लोणकर, लोकेश कांबळे, अमोल खरात, निशिकांत कांबळे, योगेश शिंदे, गोविंद खरात आदी आंदोलकांची उपस्थिती होती.