हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत विधी अधिकारी (गट ब) पदाच्या दोन रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या जाहिरातीत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना संबंधित पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा लागणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्यानुसार आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. त्यामुळे 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरावेत. तसेच, भरतीच्या तयारीला लागावे.
पदाचे नाव: विधी अधिकारी (गट ब)
एकूण जागा: 02
शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरातीत दिल्याप्रमाणे
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉर्डन लॉ कॉलेज शेजारी, चव्हाणनगर, पुणे-411008
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी अर्जाचा विहित नमुना भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज पाठवताना आवश्यक कागदपत्रे पूर्ण आणि अचूक भरलेली आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.
महत्त्वाची तारखा
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाइट: mahacid.gov.in
दरम्यान, ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील विधी क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीसंदर्भातील माहिती आणि अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी mahacid.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, माहिती वाचून लवकरात लवकर अर्ज सादर करावा. कारण, गुन्हे अन्वेषण विभागातील ही भरती तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.




