सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! MPSC अंतर्गत 228 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. एमपीएससीद्वारे गट क पदांसाठी 228 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी एमपीएससीकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांनी लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करावा. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून शेवटची तारीख २२ ऑगस्ट आहे.

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख -01 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

पदांचे नाव-

१) उद्योग निरीक्षक गट क / उद्योग निरीक्षक गट क : 06 पदे
२) दुय्यम निरीक्षक गट क / से इन्स्पेक्टर ग्रुप सी : 09 पदे
३) कर सहायक, गट क / कर सहाय्यक, गट क : 114 पदे
४) लिपिक टंकलेखक गट क (मराठी ) / लिपिक टंकलेखक गट क : 89 पदे

एकूण पद संख्या- 228 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी-

अमागास रु.394/

मागासवर्गीय रु.294/

माजी सैनिक रु.44/

पात्रता

उद्योग निरीक्षक, गट-क

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली आहे . उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या (MPSC Recruitment 2022) गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवाविज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कर सहाय्यक-

मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

लिपिक-टंकलेखक –

मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति निट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

असा करा अर्ज –

• अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.

• अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

• परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY