तरुणांचा दिसत असलेला उत्साह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आणेल : आ. शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरेगाव तालुक्यातील वर्धनगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी काल सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीबाबत विधान केले. वर्धनगड व पवारवाडीसह पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांची गर्दी पाहता राजकीय वातावरण बदलत चालले आहे. पहिली परिवर्तनाची सुरुवात वर्धनगड, पवारवाडीमधून होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. आज कार्यक्रमात तरुणांचा दिसत असलेला उत्साह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच बळकटी आणेल, असा विश्वास आ. शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी आ. शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कुंभार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याने त्यांचा सत्कार केला. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी रोहित चव्हाण नेर, राजेंद्र वरेकर, शंकर अनपट, संतोष कुंभार, विठ्ठल पाचंगणे, अक्षय मोहिते, अक्षय अनपट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. शिंदे म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षात कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह असलेला दिसून येत आहे. राजकारणात युवा पिढी सक्रिय उतरली असून पुढील काळात राजकीय वातावरणात चांगले फेरबदल होणार असल्याचे चिन्ह दिसून येत होते. हे असेच परिवर्तन होत गेले तर राज्यातील राजकारण एक वेगळेच वळण घेईल, अशी अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात मोठी बळकटी निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे, असे चित्र आज तरी स्पष्टपणे दिसत आहे.