हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जर तुम्हाला मुंबईमध्ये नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की मुंबईतील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र आणि उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, ही भरती प्रक्रिया एकूण 09 रिक्त पदांसाठी केली जात आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2024 आहे. (Job Requirement)
मिळालेल्या माहितीनुसार, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेअंतर्गत मेडिकल स्पेशालिस्ट, डेंटल ऑफिसर, नर्सिंग असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्यून, सफाईवाला, चौकीदार या पदाच्या एकूण नऊ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. प्रत्येक एका पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी आहे. त्यामुळे याबाबत अधिक माहिती ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तपासावी.
या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 55 वर्षे इतकी असायला हवी. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी अर्ज ओ आय/सी स्टेशन हेडक्वार्टर्स, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-४०००८८ या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवून द्यावेत. अर्जासह आवश्यक कागदपत्रे ही जोडावी. लक्षात ठेवा की अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी https://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.