हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राजेश टोपे म्हणाले, गट ‘क’ आणि गट ‘ड’ च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून, ही प्रक्रिया सुद्धा दोन महिन्यात संपवण्यात येईल. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये २०५ कोटी रुपयांचा निधी राज्य आपत्कालीन निधीतून मंजूर करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले, १५ वर्षांपूर्वीच्या १००० रुग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या असून, उर्वरित ५०० रुग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत