नवी दिल्ली वृत्तसंस्था : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लार्क केडर मधील ज्युनिअर असोसिएट्स(कस्टम सपोर्ट आणि सेल्स)पदावरील भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेत तब्बल पाच हजार जागांची भरती होणार आहे.
कुठे कराल अर्ज
-एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
– अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 17 मे आहे.
– अर्ज करण्यासाठी sbi.co.in , bank.Sbi/careers या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात.
निवड प्रक्रिया
– ज्युनिअरअसोसिएट्स पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
-अर्ज करताना उमेदवार जी प्रदेशिक भाषा निवडतील त्या भाषांमधले परीक्षेचे आयोजन केले जाईल.
-पूर्व परीक्षा एक तासाची असेल यामध्ये इंग्रजी भाषा तार्किक क्षमता,गणितीय क्षमता या संबंधित 100 प्रश्न असतील.
-ही परीक्षा 100 गुणांसाठी होईल आणि २.२५ गुण चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील.
– पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल.
ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागणार आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. स्टेट बँकेच्या जुनियर असोसिएट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 17900 ते 47 हजार 920 पगार मिळेल. उमेदवारांनी एसबीआय ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्या नंतरच सदर अर्ज करावा.