मुंबईसह कोकण किनारपट्टीत ‘रेड अलर्ट’ जारी, ‘या’ जिल्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

maumbai rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून मुंबईमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस देखील मुंबई ते धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबईबरोबरच कोकण किनारपट्टीत ही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘या’ जिल्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

याबरोबरच पुढील तीन तासात मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्ते आणि गटारी तुंबल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तर पावसामुळे लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या वर्षी देशात 101 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मान्सूनचे आगमन झाले. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडला आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठीअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार हे दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.