लाल कांदा ‘या’ आजारावर ठरत आहे रामबाण उपाय; जाणून घ्या सर्व फायदे

Red Onion Benefits
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रोजच्या आहारातील भाज्यांना रुचकर, स्वादिष्ट बनवण्यामध्ये कांद्याचा सगळ्यात मोठा हात असतो. कांदा भाजीत टाकला नाही की त्या भाजीला कसलीच चव येत नाही. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, तुम्ही भाजीत नक्की कोणता कांदा टाकता? तुम्ही जर लाल कांदा वापरत असाल तर तो नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे. कारण लाल कांदा हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय आहे.  चला तर मग जाणून घेऊयात लाल कांद्याचे गुणकारी फायदे.

लाल कांदा खाण्याचे फायदे

ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास आहे त्या व्यक्तींनी लाल कांदा खाणे सर्वात गरजेचे आहे. लाल कांदा खाल्ल्यामुळे अस्थमाचा आजार बरा होतो. तसेच खोकला, अस्वस्थ आणि श्वास न घेता येण्याचा त्रास देखील त्वरित बरा होतो. आपल्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत कांदा हा सर्वात फायदेशीर ठरतो. केसांचे मुळ घट करण्यापासून ते एखादा शारीरिक आजार बरा करण्यामध्ये कांदा अत्यंत उपयोगी ठरतो.

रोजच्या आहारात घेत असणाऱ्या लाल कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स तत्व असतात. फ्लेवेनॉएड्स आणि एंथोसियानिंस हेही तत्व या लाल कांद्यामध्ये पाहिला मिळतात. मुख्य म्हणजे, लाल कांद्यात तब्बल २५ प्रकारचे एंथोसियानिंस तत्व असतात. आपल्या शरीरातील रक्त नैसर्गिकरित्या पातळ करण्यासाठी कांदा गुणकारी ठरतो. लाल कांद्यात फायटोकेमिकल्स सुद्धा असते. ज्याने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत होते.

दुसरे सांगायचे झालेच तर, लाल कांद्यात व्हिटॅमिन k, B6 आणि C भरपूर प्रमाणात असते. तसेच कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. फायबरमुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. या लाल कांद्यामध्ये फोलेट, थियामिन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मॅगनीज असे खनिज पदार्थ देखील असतात. जे शरीरासाठी सर्वात आवश्यक असतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लाल कांदा हा अस्थमाच्या आजाराला दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी उपाय ठरतो. लाल कांद्यातील तत्त्वांमुळे म्हणजेच थिओसल्फेट, क्यूसरसेटिन आणि एंथोसियानिन सियानिडिनमुळे अस्थमाच्या आजाराचा नायनाट होतो. त्यामुळे जर तुम्हाला अस्थमा या आजारांसोबत इतर काही शरीराशी संबंधित आजार असतील तर तुम्ही लाल कांदा आहारात नक्की घ्या.