Red Tea : ‘रेड टी’चे सेवन ‘ग्रीन टी’ पेक्षा अधिक फायदेशीर; कसे? ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Tea) बऱ्याच लोकांची सकाळ चहा घेतल्याशिवाय होत नाही. त्यामुळे जगभरात अनेक चहाप्रेमी आढळून येतात. अशा लोकांना दिवसभरात कधीही चहासाठी विचाराल तर ते नाही म्हणूच शकत नाहीत. आजकाल ‘ग्रीन टी’ किंवा ‘ब्लॅक टी’ पिणाऱ्यांची संख्या जास्त पहायला मिळते. कॉव्हिडनंतर बरेच लोक आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरतील असे पर्याय शोधले जातात. त्यांपैकी एक म्हणजे ग्रीन टी आणि ब्लॅक टी. पण तुम्ही कधी ‘रेड टी’ प्यायले आहात का? आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या या चहाबद्दल जर तुम्हाला माहित नसेल तर हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला या चहाबद्दल पूर्ण माहिती देऊ.

‘रेड टी’ कसा बनवला जातो? (Red Tea)

‘रेड टी’ हा आरोग्यवर्धक चहा डाळिंबाच्या दाण्यांपासून बनवला जातो. त्यामुळे त्याचा रंग लाल असतो. या चहाला काही लोक रुबी टी म्हणून देखील ओळखतात. रेड टी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. यासाठी ३ कप डाळिंबाचे दाणे आणि १ चमचा मध एकत्र करुन मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. एखाद्या बरणीत वा बाटलीत हे मिश्रण साठवून ठेवा. जेणेकरुन तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा याचा वापर करता येईल. रेड टी बनवताना २- ३ कप पाण्यात १/४ कप मिश्रण घालून उकळवा. तुमचा रेड टी मिनिटांत पिण्यासाठी तयार.

रेडी टी पिण्याचे फायदे

निरोगी हृदय – रेड टीचे नियमित सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य राखले जाते. कारण यातील अँटिऑक्सिडंट्स तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. (Red Tea) हे एसीईला प्रतिबंधित करून रक्तदाबावर सकारात्मक परिणाम करतात. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तदाब अप्रत्यक्षपणे वाढतो. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते आणि हृदय निरोगी राहते.

मधुमेह २ पासून सुटका – रेड टी मध्ये ॲस्पॅलाथिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. काही संशोधनात असे समोर आले आहे की, या अँटी-ऑक्सिडंटमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. (Red Tea) त्यामुळे मधुमेही या चहाचे सेवन करू शकतात. इतकेच नव्हे तर टाईप २ मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी देखील हा चहा चांगला मानला जातो.

कॅफीनमुक्त पेय – चहा कॉफीत कॅफिन असते. ज्यामुळे मेंदूचे आरोग्य खराब होते. त्यामुळे संतुलित प्रमाणात कॅफिनचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. असावेळी तुम्ही कॅफीनमुक्त पेय शोधत असाल तर रेड टी एक सर्वोत्तम पर्याय आहे हे लक्षात घ्या.

हाडांची मजबुती – रेड टीमध्ये पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंटची मात्र जास्त असते. ज्यामुळे शरीरातील हाडांची खनिज घनता वाढवण्यास मदत होते. (Red Tea) परिणामी कमकुवत हाडांना मजबुती मिळते. तसेच ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून संरक्षणदेखील मिळते.