हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Redmi ने आपला नवा मोबाईल Redmi Note 12 4G भारतात लाँच केला आहे. Note 12 सिरीज अंतर्गत हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5,000mAh च्या दमदार बॅटरीसह अनेक दमदार वैशिष्ट्यांसह हा मोबाईल सुसज्ज आहे. चला आज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किंमतबाबत…
6.67-इंच डिस्प्ले –
Redmi Note 12 4G मध्ये 6.67-इंच फुल-HD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे, टच सॅम्पलिंग रेट 240 Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 1200 nits आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालतो. या मोबाईलमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाईलचे वजन 183.5 ग्रॅम आहे.
50 MP कॅमेरा- (Redmi Note 12 4G)
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतोय. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूस 13 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे.
फीचर्स –
मोबाईलच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी फीचर्स आहेत. उजव्या बाजूला साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Redmi Note 12 4G मध्ये 5,000mAh बॅटरी मिळतेय. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
Redmi Note 12 4G स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या 6GB + 64GB मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा मोबाईल लुनार ब्लॅक, फ्रॉस्टेड आइस ब्लू आणि सनराइज गोल्ड या ३ रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन Amazon, mi.com वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवरून 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तुम्हांला खरेदी करता येईल.