Regular की Comprehensive यापैकी कोणता Health Plan सर्वांत चांगला आहे ते जाणून घ्या

0
72
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोविड-19 पासून, हेल्थ इन्शुरन्सबाबत लोकांमध्ये बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात जितका हेल्थ इन्शुरन्स विकला गेला तितका यापूर्वी कधीही विकला गेला नव्हता. हेल्थ इन्शुरन्सबाबत अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे की नक्की कोणता हेल्थ इन्शुरन्स घ्यावा ? थोडक्यात सांगायचे तर, हेल्थ इन्शुरन्सचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे रेग्युलर हेल्थ प्लॅन आणि दुसरा आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ प्लॅन . आज आम्ही तुम्हाला या दोघांबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकाल.

रेग्युलर आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत उपचारासाठी आवश्यक असलेल्या बेसिक हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचा समावेश करतात. मात्र, विशिष्ट प्रकारचे खर्च रेग्युलर प्लॅन्समध्ये समाविष्ट केले जात नाहीत आणि यामध्ये इन्शुरन्सची रक्कम (सम-इंश्योर्ड) देखील एका मर्यादेपर्यंत उपलब्ध आहे.

कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅन
जर आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅनबद्दल बोललो, तर नियमित आरोग्य तपासणी, गंभीर आजार, ज्ञात किंवा अज्ञात रोग जसे की कोविड-19 पर्यंत सर्व काही त्यात समाविष्ट आहे. यामध्ये नेटवर्क हॉस्पिटल्समधील कॅशलेस उपचारांचे फायदे, रुग्णवाहिकेचे शुल्क, डे केअर प्रोसेस, पर्यायी उपचार पर्याय, उपभोग्य खर्च आणि हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतरचे खर्च समाविष्ट आहेत.

इतकेच नाही तर, याशिवाय, बहुतेक कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये ओपीडीचा खर्चही कमी असतो. यासोबत काही Add-On कव्हर्सही उपलब्ध आहेत आणि काही रायडर्सही घेता येतात. विशिष्ठ कालमर्यादेनंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये आधीच-अस्तित्वात असलेले रोग देखील समाविष्ट केले जातात. जरी विमाधारकाला फिजिओथेरपी, होमिओपॅथी, एक्युपंक्चर किंवा ऑस्टियोपॅथी मधून उपचार मिळत असले तरी त्याला मर्यादेपर्यंत कव्हर मिळते.

रेग्युलर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन
आता रेग्युलर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनबद्दल बोलूयात. इन्शुरन्स प्लॅन मर्यादित कव्हरेज देते. रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा वैद्यकीय खर्च यामध्ये समाविष्ट केला जातो. जर रूग्ण 24 तासांपेक्षा जास्त काळ रूग्णालयात दाखल असेल, तर त्याला निदान शुल्क, औषधांचा खर्च, डॉक्टर सल्ला शुल्क, खोलीचे भाडे इत्यादींसह इतर काही वैद्यकीय खर्च देखील समाविष्ट आहेत. यामध्ये रुग्णवाहिकेचा खर्च, दे केअरची प्रोसेस, ठराविक कालावधीनंतर आधीच अस्तित्वात असलेले आजार यांचाही समावेश होतो. याशिवाय वैद्यकीय तपासणीचीही सोय आहे.

रेग्युलर किंवा स्टॅंडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सहसा जास्त खरेदी केली जाते. इन्शुरन्स कंपन्या यामध्ये 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर देतात. कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन जर आपण वरील दोन्ही प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्सचा अंतर्भाव केला तर जास्त चांगली दिसते. त्याचे कारण म्हणजे त्यात जास्त आजारांचा समावेश आहे आणि अनेक प्रकारचे अतिरिक्त खर्चही उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here