सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 750 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 756 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 299 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 86 हजार 20 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 80 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 182 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 16 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 9 हजार 286 जणांचे नमुने घेण्यात आले.
गेल्या आठवडाभरात सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही चार अंकी संख्येवरून तीन अंकीवर ठेवण्यात यश आले आहे. कोरोना बाधितांचा पाॅझिटीव्हीटी दर कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियमात शिथिलता दिलेली आहे. यामुळे मागील आठवडा जिल्ह्याला दिलासादायक ठरलेला आहे.