हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reliance Industries) देशातील सर्वात मोठा उद्योग समूह म्हणून रिलायन्सची ओळख आहे. या उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. व्यापाराचा विस्तार वाढवण्याच्या दिशेने मुकेश अंबानी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. महाराष्ट्रातील सर्वांत जुनी कंपनी आता रिलायन्स समूहाने विकत घेतली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्सने रावळगावच्या शुफर फार्मचा मिठाई उद्योग कोट्यवधी रुपयांमध्ये खरेदी केला आहे.
किती कोटींची झाली डील (Reliance Industries)
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही डील तब्बल २७ कोटी रुपयांना केली आहे. ही डील यशस्वी झाल्यानंतर करारानुसार रावळगाव शुफर फार्म मिठाई उद्योगाचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क रिलायन्सकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती रावळगाव शुगर फार्म यांनी दिली. मात्र, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने अद्याप या डीलबाबत कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलेले नाही.
रावळगाव शुगर फार्म
नाशिक जिल्ह्यातील रावळगाव या गावात १९३३ साली या साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली. उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी हा साखर कारखाना सुरु केला होता. सुरुवातीला हि कंपनी फक्त साखर कारखाना म्हणून प्रसिद्ध होती. मात्र पुढे जाऊन १९४० मध्ये या कंपनीने मिठाई व्यवसायात पदार्पण केले. (Reliance Industries) पुढील दोन वर्षात १९४२ मध्ये या कंपनीने टॉफी बनवण्यास सुरु केली. कंपनीचा वाढत व्यापार ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब होती. या कंपनीच्या उत्पादनांची जितकी विक्री होते त्यातील ५०% विक्री हि महाराष्ट्रातून होते. या कंपनीचे पान पसंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक सारखे एक दोन नव्हे तर तब्बल ९ ब्रँड आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून रावळगाव शुगर फार्म ही कंपनी ग्राहकांची पसंत ओळखून सेवा प्रदान करते आहे. मात्र अलिकडच्या काही वर्षांत या कंपनीला व्यवसाय टिकवणे कठीण झाले. उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचा कंपनीच्या उत्पादन विक्रीवर परिणाम होऊ लागला. ज्यामुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा कमी झाला. एकीकडे साखरेचे वाढते दर तर दुसरीकडे उत्पादन निर्मितीसाठी लागणारा खर्च, मजुरीचा खर्च यामुळे कंपनीचा नफा कमी झाला. मध्यंतरी कोरोनाच्या काळात कंपनीच्या उत्पादन विक्रीवर मोठा आघात झाला. परिणामी हा व्यवसाय सुरु ठेवणे कंपनीला जड जाऊ लागले. (Reliance Industries)