हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Reliance Industries Q3 Result – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने 2024-25 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या (ऑक्टोबर-डिसेंबर) कामगिरीचे अहवाल जाहीर केला असून, कंपनीच्या नफ्यात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने या तिमाहीत 18,540 कोटी रुपयांचा नफा कमावला, जो जुलै-सेप्टेंबर 2024 च्या तिमाहीतील 17,265 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एकूण महसुलात वाढ (Reliance Industries Q3 Result)–
(Reliance Industries Q3 Result) कंपनीचा एकूण महसूल देखील 6 टक्क्यांनी वाढून 2.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचा महसूल 2.25 लाख कोटी रुपयांवर होता. याबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एबिटात (EBITDA) 8 टक्क्यांची वाढ होऊन ती 43,789 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच रिलायन्स जिओ इन्फोकॉमची कामगिरीही उत्तम राहिली आहे. जिओने या तिमाहीत 6,477 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांची वाढ दर्शवतो. कंपनीचा महसूल 29,307 कोटी रुपयांवर पोहोचला असून, एबिटामध्येही वाढ झाली आहे.
मुकेश अंबानी यांची प्रक्रिया –
मुकेश अंबानी यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले, “आमच्या ऑईल टू केमिकल बिझनेसने उत्कृष्ट प्रगती केली आहे आणि जामनगरच्या रिफायनरीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. कंपनीच्या रिफायनिंग मार्जिनमध्ये देखील सुधारणा झाली आहे. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये देखील चांगली वाढ पाहायला मिळत आहे.” रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries Q3 Result) कामगिरीमुळे शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली असून, कंपनीच्या शेअरमध्ये वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी!! राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलं शपथपत्र