रिलायंस जिओचा नवीन Work From Home Pack,मिळणार १०२ जीबी डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. २५१ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे.

२५१ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा मिळेल. डेटामर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड म्हणजे ६४kbps चा होईल.५१ दिवसांची वैधता असलेहा हा केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन आहे, त्यामुळे दररोज २ जीबी डेटासह युजर्सना एकूण १०२ जीबी डेटा मिळेल. केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन असल्याने या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

याशिवाय दोन दिवसांपूर्वीच कंपनीने आपले निवडक ४ जी डेटा व्हाउचर प्लॅन अपग्रेड केले, त्यामुळे आता जिओ युजर्सना ४ जी डेटा व्हाउचरमध्ये डबल डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. जिओने बदल केलेल्या ४ जी डेटा व्हाउचरमध्ये (Booster Pack) ११ रुपये,२१ रुपये,५१ रुपये आणि १०१ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

आता ११ रुपयांच्या बूस्टर प्लॅनमध्ये तुमच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनची व्हॅलिडिटी आणि अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी ७५ मिनिटं मिळतील. तर, २१ रुपयांच्या ४ जी डेटा व्हाउचरमध्ये युजर्सना अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्या वैधतेसह २ जीबी डेटा आणि जिओ-टू-नॉन जिओ कॉलिंगसाठी २०० मिनिटं मिळतील. याशिवाय,५१ रुपयांच्या ४ जी डेटा व्हाउचरमध्ये अन्य नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी ५०० मिनिटं मिळतील. या प्लॅनमध्ये मिळाणारा डेटाही ३ जीबीऐवजी ६ जीबी मिळेल. प्लॅनची व्हॅलिडिटी अ‍ॅक्टिव्ह प्लॅनइतकीच असेल. तर,१०१ रुपयांच्या ४ जी डेटा व्हाउचरमध्ये आता १००० नॉन-जिओ मिनिट मिळतील, याशिवाय आता ६ जीबी डेटाऐवजी १२ जीबी डेटा मिळेल. या सर्व प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment