भारतीय बाजारात येणार Relianace ची कार, इतर कंपन्यांना देणार टक्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल तरुणांमध्ये गाड्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात देखील अनेक नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. सध्या बाजारात अनेक स्वदेशी त्याचप्रमाणे परदेशी गाड्या देखील उपलब्ध आहेत. परदेशात तयार झालेल्या देखील अनेक गाड्या भारतात आणून विकल्या जातात. त्याचप्रमाणे भारतात देखील अनेक गाड्या तयार होतात.

भारतामध्ये टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा या गाड्यांच्या कंपन्या खूप प्रसिद्ध आहेत. अनेक लोक याच कंपन्यांच्या गाड्या खरेदी करत असतात. आणि आता या यादीत रिलायन्स या कंपनीच्या नावाचा देखील समावेश होऊ शकतो. अशी माहिती समोर आलेली आहे.

रिलायन्सची कार बाजारात

आपल्या देशातील सर्वात मोठे उद्योगपती अनिल अंबानी हे रिलायन्स या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता देशामध्ये इलेक्ट्रिक कार आणि त्यासाठी लागणारी बॅटरी तयार करण्याची प्लॅन करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रिलायन्स या कंपनीने चीनची कार निर्माता कंपनी डीवायडी यांच्या माजी भारतीय कार्यकारी अधिकाऱ्याला कंपनीत सामील करून घेतलेले आहे. या प्लॅनसाठी लागणाऱ्या खर्चानुसार कंपनीत समावेश केलेला राहणार आहे.

रिलायन्स या कंपनीचा सुरुवातीला उद्देश हा केवळ एखादा प्लांट तयार करणे आहे. यानुसार एका वर्षात जवळपास 2 लाख 50 हजारे वाहने तयार होऊ शकतील. तर हा आकडा 7 लाख 50 हजार एवढा देखील वाढू शकतो. तसेच या वाहनांच्या उत्पादनासोबत रिलायन्स एक तास एवढ्या क्षमतेची बॅटरी देखील उभारणार आहे.

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांनी त्यांचा छोटा भाऊ अनिल अंबानी यांनी 2005 मध्ये त्यांचे उद्योग वेगवेगळे वाटून घेतले. सध्या मुकेश अंबानी त्यांच्या कंपनीत बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचे काम करत आहे. तसेच अनिल अंबानी यांनी देखील कारसोबत बॅटरीचे उत्पादन सुरू केलेले आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन भाऊ वाहनांच्या शर्यतीत समोरासमोर येतील.