मेहुणीवर बलात्कार केल्याने राहिली गरोदर; पीडिता बहिणीच्या प्रसूतीसाठी मदतीस आली होती

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दौसा : वृत्तसंस्था – दौसा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका भावोजीने त्याच्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केला आणि त्यामधून ती गरोदर राहिली. या प्रकरणी आरोपीच्या पत्नीने मंडावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने हा गुन्हा दाखल केला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात मोठ्या बहिणीची प्रसूती झाली होती म्हणून तिने 13 जानेवारी रोजी आपल्या धाकट्या बहिणीला घरातील कामे करण्यास मदत करण्यासाठी बोलावले होते.

धाकट्या बहिणीवर मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने केला बलात्कार
प्रसूतीमुळे मोठी बहीण खोली सोडू शकत नव्हती. या परिस्थितीमध्ये पीडित मुलीच्या भावोजीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. यामुळे ती गरोदर राहिली. जेव्हा हि अल्पवयीन बहीण ४ महिन्यांपासून गरोदर राहिली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला
पोलिस स्टेशनचे प्रभारी नथुलाल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिस स्टेशन परिसरातील एका विवाहित महिलेने गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितले आहे की, गर्भवती असल्याने तिने तिच्या छोट्या बहिणीला घरातील कामात मदत करण्यासाठी तिच्या सासरच्या घरी बोलावले होते. या प्रकरणात या महिलेच्या पतीने त्याच्या १४ वर्षीय मेव्हणीला १३ जानेवारी रोजी तिच्या सासरच्या घरी आणले होते. यानंतर पीडित तरुणी १७ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या बहिणीबरोबर राहिली आणि घरातल्या कामात मदत केली. यादरम्यान महिलेच्या पतीने अनेकवेळा आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केला, यामुळे ती ४ महिन्यांची गरोदर झाली. यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

गुन्हा दाखल झाल्याच्या दुसर्‍या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्रम प्रजापत याला अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार करून तिला गरोदर बनवण्याच्या प्रकरणात अटक केली. पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.