मुंबई | करोना आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना रेमदेसिविर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी अक्षरश अस्वस्थ झाले आहेत. काही डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या आग्रहामुळे इंजेक्शन संजीवनी असल्याचे समज निर्माण झाला आहे. म्हणूनच 800 रुपये किमतीचे रेमदेसीवीर इंजेक्शन बाजारामध्ये 40 हजारांपर्यंत विकले गेले. लोकांची हतबलता आणि रेमदेसीवीर इंजेक्शनबाबत झालेला गैरसमज याला कारण आहे. यावर बोलताना आयएमए’चे सहसचिव डॉक्टर समीर चंद्रात्रे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
करोणा टास्क फोर्स’ने सांगितल्यानुसार करोणा झाल्याच्या नऊ दिवसाच्या आतमधेच हे इंजेक्शन दिल्याने त्याचा फायदा होतो. अचूक इंजेक्शन वेळी घेतल्याने पेशंट लवकर बरा होतो. नियमावलीनुसार, जेव्हा पेशंटला कृत्रिम व्हेंटिलेटर किंवा बायपेपरचा वापर करावा लागतो त्यावेळी हे इंजेक्शन उपयोगी ठरते. महत्त्वाची बाब म्हणजे, हे इंजेक्शन दिल्याने पेशंटचा जीव वाचतो असे आतापर्यंत कोणत्याही परीक्षणात दिसून आले नाही
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी रेमदेसिविरची मूळ किंमत केवळ आठशे रुपये असल्याचे सांगितले होते. तसे असेल तर राज्याने राज्य सरकारने इंजेक्शनवर सुरू असलेल्या काळाबाजारावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. रेमदेसिवीर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून करोनावरील उपचार थांबत नाही. कारण अन्य अँटिबायोटिक्स, औषधे आणि महत्वाचे म्हणजे ऑक्सिजन देखील उपयुक्त ठरतो आहे. रेमदेसिविर नाही म्हणजे रुग्ण वाचणार नाही अशी अफवा कोणी पसरू नये. हे इंजेक्शन केवळ करोनावर ठोस उपाय नाही. लोकांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group