रेमडिसिवीरचा काळाबाजार : एक इंजेक्शन पस्तीस हजाराला विकणाऱ्या वॉर्ड बॉयला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरोना रूग्णांच्यासाठी हाॅस्पीटलच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासन रोजच्या रोज 35 टक्के रेमडिसिवीर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहाथ पकडले. वॉर्ड बॉय रेमडिसिवीरचे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे.

रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना बातमीदारांकडून मिळाली. सुविधा हाॅस्पीटलमधील सुनिल विजय कचरे या वाॅर्डबाॅय स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता कोविड १९ विषाणुच्या आजारावर लागणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता. छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने इंजेक्शनची विक्री करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक अरूण सखाराम गोडसे यांना माहीती सांगितली.

त्यानुसार पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांना बनावट गिऱ्हाईक म्हणून रेमडीसीवीर या इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी पाठविण्यात आले. तेव्हा पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम यांना रेमडीसीवीर या एका इंजेक्शनची किंमत पस्तीस हजार याप्रमाणे विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी बनावट गिऱ्हाईक यांने 1 इंजेक्शन खरेदी करण्यास होकार दर्शविला. त्यानंतर फोनवर बोलणाऱ्या समोरील इसमाने मगर हॉस्पीटलच्या पाठीमागे लक्ष्मीनगर फलटण येथे लवकरात लवकर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे उपस्थित औषध निरीक्षक अरूण सखाराम गोडसे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, सहाय्यक फौजदार एस.एन.भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस नाईक एस.डी.सुळ, एन.डी.चतुरे, व्ही. के. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप हे सदर ठिकाणी रवाना होवून सापळा लावून थांबले.

तसेच बोगस गिऱ्हाईक पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी त्यांचे मोबाईल वरून विक्री करणारे इसमांचे मोबाईलवर कॉल केला असता. त्याने पुढे काही अंतरावर मी एका मोटार सायकलवर बसलेलो आहे, असे सांगितले. त्या प्रमाणे खाजगी गाडीवर जावून मोटार सायकलजवळ जावून त्या इसमांशी बोलला व रेमडीसीवीर इंजेक्शनच्या एका व्हायलची किंमत किती लागेल असे विचारले.  त्या इसमाने किंमत रुपये पस्तीस हजार लागतील असे सांगून विकत असताना त्यांचे मोबाईलची टॉर्च चालू केली. यावेळी पोलीस पथक व पंच, औषध निरीक्षक यांनी छापा टाकला असता रेमडीसीवीर इंजेक्शन विक्री करणारा इसम पळून जात असताना, त्यास जागीच गराडा घालून पकडून ताब्यात घेतले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group