Remedies For Skin Rashes : आर्टिफिशियल ज्वेलरीमूळे स्किनवर रॅशेस येतात? ‘हे’ उपाय केल्यास मिळेल आराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Remedies For Skin Rashes) एखादा लग्न सोहळा, समारंभ असला की बायका अगदी मनसोक्त नटतात. आता नटायचं म्हणजे काय? तर नवी कोरी साडी, केसात गजरा आणि मुख्य म्हणजे दागिने. अशाप्रकारे स्त्रिया त्यांचा साजशृंगार पूर्ण करतात. आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरीला मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. अनेक महिला कोणताही कार्यक्रम असेल तर हमखास आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर करतात. पण अनेकांना या ज्वेलरीमुळे त्वचेवर खाज येणे, लालसर पुरळ उठणे किंवा रॅशेज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही आर्टिफिशियल ज्वेलरीमुळे त्वचेसंबंधित समस्या जाणवत असतील तर त्वरित आराम मिळवण्यासाठी काय करावे? याविषयी आज आपण माहिती घेत आहोत.

नारळाचे तेल

अनेक महिला आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर करतात. (Remedies For Skin Rashes) यातील बऱ्याच महिलांना शी ज्वेलरी वापरल्याने त्वचेवर लाल पुरळ येणे, खाज सुटणे, जखमा होणे अशा समस्या जाणवतात. आर्टिफिशियल ज्वेलरीमुळे जर तुमच्या त्वचेवर यांपैकी कोणतीही समस्या जाणवली तर सगळ्यात आधी ही ज्वेलरी काढून टाका. त्यानंतर थंड पाण्याने अलगद हाताने किंवा कॉटनच्या कापडाने जखम झालेला भाग न घासता पुसून घ्या. यानंतर त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर नारळाचे तेल लावा. यामुळे काही वेळाने जळजळ थांबेल आणि सूज कमी होऊन आराम मिळेल.

गेहना पेंट

आर्टिफिशियल ज्वेलरीमूळे होणाऱ्या ॲलर्जीवर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे बाजारात उपलब्ध असणारी पातळ पारदर्शक रसायने. यामध्ये गेहना पेंटचा समावेश आहे. (Remedies For Skin Rashes) हे रसायन दागिन्यांवर ब्रशने लावले असता ते लगेच सुकते. मुख्य म्हणजे, हे रसायन लावल्यानंतर दागिने घातल्यास कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही. शिवाय दागिन्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसानदेखील होत नाही. दागिन्यांची चमक आहे तशीच राहते. त्यामुळे कोणत्याही चिंतेशिवाय तुम्ही या रसायनाचा वापर करून दागिन्यातील धातूचा त्वचेशी येणारा थेट संपर्क टाळू शकता.

‘हे’ पदार्थ खाणे टाळा

ज्या लोकांना आर्टिफिशियल ज्वेलरीमुळे त्वचेशी संबंधित समस्या जाणवतात, अशा लोकांनी आपल्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. अनेकांना कथिलाची अंतर्गत ॲलर्जी असते. (Remedies For Skin Rashes) ज्यामुळे आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर केला असता त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. अशा लोकांनी आपल्या आहारात ओट्स, गव्हांकुर, मल्टीग्रेन ब्रेड, मासे, कोळंबी, कालवे, शिंपल्या, शेंगदाणे, सोयाबीन, अननस, अंजीर, रासबेरी आणि विविध प्रकारची चॉकलेट्स खाण्याचे प्रमाण कमी करावे वा टाळावे.

डॉक्टरांचा सल्ला (Remedies For Skin Rashes)

अनेकांना आर्टिफिशल ज्वेलरीच्या वापरामुळे प्रचंड प्रमाणात त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी स्वतःच्या मनाने कोणतेही औषध उपचार करण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. यावर उपाय म्हणून डॉक्टर स्टिरॉईडयुक्त मलम आणि औषधे देतात. ज्यांची मात्रा निश्चित असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, याचा वापर केल्यास ॲलर्जीपासून लगेच सुटका मिळवता येते.

महत्त्वाचे

आजकाल बाजारात मोठ्या प्रमाणात आर्टिफिशल ज्वेलरी उपलब्ध आहे. दिसायला अत्यंत सुंदर आणि पैशाच्या मानाने अत्यंत स्वस्त असल्यामुळे अनेक महिला आर्टिफिशियल ज्वेलरीला पसंती देतात. (Remedies For Skin Rashes) मात्र, आरोग्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल ज्वेलरीचा अतिवापर हा अत्यंत धोकादायक मानला जातो. थोडक्यात काय? तर फॅशन ज्वेलरीची ॲलर्जी असल्यास शुद्ध सोन्याचे दागिने वापरावे. एखाद्या वेळेस वाटले म्हणून आर्टिफिशियल ज्वेलरी घालायची असेल तर त्यापूर्वी दागिन्यांवर रसायनांचा थर लावावा आणि त्यानंतरच अशा दागिन्यांचा वापर करावा.