हाताच्या कोपरा काळा झाला असेल तर ‘या’ घरगुती उपायांचा करा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपले शरीर जरी स्वच्छ असले तरी आपल्या हातावरील कोपरा हा भाग काळा दिसायला सुरुवात होते. त्यामुळे हात छान दिसत नाही. चेहरा, हात, पायांच्या त्वचेची आपण काळजी घेतो. कारण ते आपले सौंदर्य खुलवण्यामध्ये ते महत्वाची भूमिका बजावतात. चेहऱ्यावर अथवा हातपायांवर पुरळ, फोड, अथवा त्वचा काळवंडणे असे काही झाले असले कि आपण लगेच त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देतो. अनेक वेळा कोपर, गुडघ्याचा काळेपणा घालवण्याकडे दुर्लक्ष करतो. अनेक वेळा मुलींना वेगवेगळी कपडे घालण्याची सवय असते. त्यावेळी स्टायलिश शॉर्ट कपडे घातल्यावर हा कोपराचा काळेपणा उठून दिसतो. याचा परिणाम थेट तुमच्या लुक वर होतो. यासाठी घरगुती कोणते उपाय केले पाहिजेत याबदल माहिती घेऊया ज्याने तुमच्या गुढघा व कोपऱ्याचा काळेपणा निघून जाईल. चला तर जाणून घेऊयात कोपर व गुडघ्याचा काळेपणा घालवण्याचे उपाय.

अनेक वेळा चेहऱ्याला डाग पडले असतील तर त्यावेळी आपण खूप काळजी घेतो. त्वचेच्या सौंदर्यासाठी हळदीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. हळदीमध्ये दूध व थोडेसे मध घालून त्याची पेस्ट बनवून घ्या. आणि ती पेस्ट रात्री गुडघा पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडा करून घ्या व त्यावर लावा. कमीत कमी २० मिनिटे ठेवून थंड पाण्याने ही पेस्ट धुवून घ्या.कोपरा व गुडघ्याचा काळेपणा जाण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

खाण्याचा सोडा हा पोटातील अपंचनासाठी अनेक वेळा फायदेशीर ठरत आहे. बेकिंग सोडा तुमच्या त्वचेवरील धूळ व घाण साफ करण्यासाठी फायदेशीर आहे. हा कोपरांवरील वरील काळेपणा काढून टाकतो यासाठी एक चमचा बेकिंग सोडा दुधामध्ये मिसळून त्याची चांगली पेस्ट करून घ्या.ही पेस्ट गुडघा व कोपरांवर लावा व हलक्या हाताने मसाज करा. बेकिंग सोडा व दुध त्वचा स्वच्छ करून काळेपणा काढून टाकते.

घरात असलेल्या खोबरेल तेलाचा वापर सुद्धा काळपट पणा दूर करण्यासाठी केला जातो. खोबरेल तेल तुमच्या गुडघा व कोपऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. आधी कोपरा व गुडघा साबणाने स्वच्छ धुवून घ्या.चांगले पुसून कोरडे केल्यावर त्यावर खोबरेल तेलाने मालिश करा. असे केल्याने काळपटपणा निघून जाईल व त्वचाही मऊ होईल.

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी बेसनाचा वापर नेहमी केला जातो. बेसनामध्ये थोडेसे लिंबू मिसळून हे मिश्रण तुमच्या गुडघा व कोपऱ्यावर लावा व मसाज करा थोड्या वेळाने धुवून टाका. गुडघा व कोपऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी संत्री, टोमॅटो, लिंबू यासारख्या हंगामी फळांचा देखील चांगला वापर करू शकता.ही फळे काळवंडलेल्या त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. याचा रस वाळल्यानंतर थंड पाण्याने त्वचा धुवून घ्या. तुमचे हात अजून गोरे होतील आणि तुमच्या हाताचा कोपरा हा अजून सुंदर दिसेल .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’