हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी (Renault Kiger 2022) Renault ने आपली Renault Kiger ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली असून नुकतीच या गाडीची फर्स्ट राईड पाहायला मिळाली. अनेक अत्याधुनिक फीचर्ससह ही कार लॉन्च झाली असून या SUV ची थेट टक्कर Maruti Suzuki Vitara Brezza, Toyota Urban Cruiser, Nissan Magnite, यांच्याशी होईल. चला आज आपण जाणून घेऊया या कार मधील काही खास गोष्टी….
फीचर्स-
या गाडीच्या वैशिष्ट्या बाबत बोलायच झालं तर, Renault Kiger 2022 मध्ये क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. समोरच्या बाजूला स्प्लिट (Renault Kiger 2022) हेडलॅम्प सेटअप आहे जो LED DRLs क्रोम ट्रिमसह युनिक लोखंडी जाळीच्या बाजूला आहेत. तसेच बंपरला LED हेडलॅम्प आणि तळाशी एक नवीन स्किड प्लेट मिळते. कारमध्ये 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स देखील अपडेट केले आहेत.
इंजिन- (Renault Kiger 2022)
Renault Kiger मध्ये दोन इंजिन पर्याय (Renault Kiger 2022) देण्यात आले आहे. यात 1.0L एनर्जी इंजिनला MT आणि EASY-R AMT ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. तसेच 1.0L टर्बो इंजिनमध्ये MT आणि X-TRONIC CVT ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 20.5 kmpl मायलेज देते.
काय आहे किंमत-
गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झालं तर 2022 Renault Kiger ची एक्स-शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे. चेन्नई येथील प्लांटमध्ये गाड्यांची निर्मिती करून तिथून भारतीय बाजारपेठेत विकले जाते तसेच नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया सारख्या परदेशातही निर्यात केले जाते.
Volvo XC40 Recharge : Volvoने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV; पहा किंमत आणि फीचर्स
Maruti Suzuki Grand Vitara 2022 : मारुती सुझुकीची Grand Vitara लाँच; पहा काय आहे किंमत?
Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत