औरंगाबाद | डिसेंबर पर्यंत सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण होणार आहे. नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून नाट्यगृहे बंद आहेत. स्मार्ट सिटीच्या योजनेतून साडेतीन कोटी रुपये खर्च करून सिडको नाट्यगृहाचा चेहरा बदलण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ रंगमंदिर धूळखात, बिनकामी पडलेले आहे. तुटलेल्या खुर्च्या, पडदे, रस्त्यात पडलेले खिळे, खराब सिंथेसायझर यामुळे नागरिकांनी महापालिकेला रंगमंदिर दुरुस्ती करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी दखल घेतली. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता ही तरतूद आठ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन चे मुख्याधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी संत एकनाथ रंगमंदिराचे रखडलेले काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी डिसेंबर पर्यंतची डेडलाईन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अगोदरही डेडलाईन देण्यात आलेली होती परंतु ती पाळली गेली नाही आता पुन्हा डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.