पक्षाने आदेश दिल्यास फडणवीसांविरोधात लढणार; नाना पटोलेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आदेश दिल्यास फडणवीसांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवेन अस म्हणत नाना पटोले यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत फडणवीस विरुद्ध पटोले असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

नागपूर महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी  नाना पटोले यांनी जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत बोलताना पटोले यांनी मोठं विधान केलंय. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे.

दरम्यान यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गडकरी याना पराभूत करेन अन्यथा राजकारणातुन संन्यास घेईन अशी घोषणा त्यावेळी नाना पटोले यांनी केली होती. परंतु गडकरी यांच्या कडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नाना राजकारणात अधिकच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.

You might also like