ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच – रेणू शर्मा

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट् करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, पोलीस जेव्हा या गोष्टीचा तपास करतील तेव्हा या सगळं काही समोर येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय?, असा सवाल रेणू यांनी केला. तसेच, पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलंय. या प्रकरणाचा पोलीस जेव्हा सखोल तपास करतील तेव्हा सगळं काही समोर येईलच असं म्हणत त्यांनी या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

दरम्यान, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फक्त बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं काही होत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची बाजू मांडली आहे. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करुणा शर्मा या रेणू शर्मा यांच्या बहीण आहेत. तसेच, परस्पर सहमतीच्या संबंधामधून करुणा शर्मायांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये असल्याचेही त्यांनी म्हटलंय. सदर दोन्ही मुलांना मुंडे यांनी त्यांचे नाव दिल्याचे सांगत सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव असल्याचं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here