परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्याचा पारा 45 पार होऊन तापमान कमालीचे वाढले असताना जिल्ह्यामध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेले आहे .पाथरी शहराच्या शेजारील रेणुका शुगर कारखान्याच्या परिसराला वीज वितरण ची तार तुटून पडल्याने आग लागण्याची घटना शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी घडली असून सुदैवाने यामध्ये कुठलेही नुकसान झाले नाही.
26 एप्रिल रोजी पाथरी तालुक्यातील अंधापुरी व रेनापुर शिवारात आग लागून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना घडल्या असतानाच शनिवारी पाथरी शहराच्या शेजारील असणाऱ्या रेणुका शुगर साखर कारखान्याच्या परिसरात दुपारी 4 वाजता मोठी आग लागली. या वेळी वीज वितरण च्या विद्युत खांबावरिल तार तुटून ही घटना घडली. यावेळी साखर कारखान्यातील कर्मचारी व बाजूच्या वस्तीतील लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान पाथरी नगरपालिकेचा अग्निशामक बंब यावेळी आग विझवण्यासाठी दाखल झाला होता. कारखाना परिसरांमध्ये प्रचंड वाळलेले गवत असणाऱ्या सुमारे चार एकर क्षेत्रावर ही आग लागली होती सुदैवाने बाजूलाच असलेल्या साखर गोडाऊन व साखर कारखान्याच्या मुख्य युनिट इमारतीसह शेजारील लोकवस्तीला याची कुठलीही इजा पोहोचली नाही . याच ठिकाणी कारखाण्याने मोठया प्रमाणात बगॅस साठवलेला असुन त्या ठिकाणा पर्यंत आग पोहचू नये म्हणुन कारखान्याचे कर्मचारी प्रयत्न करत होते . बातमी लिही पर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती .