Repo Rate RBI : रेपो रेट बाबत RBI चा मोठा निर्णय!! तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

Repo Rate RBI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate RBI । रेपो रेट बाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. झर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट मध्ये कोणताही बदल केलेला नाही. आधीप्रमाणेच तो ५.५० टक्के इतका असणार आहे. त्यामुळे तुमच्या EMI वर कोणताही परिणाम होणार आहे. सध्या जो EMI तुम्ही भरत आहात तो तसाच कायम असणार आहे. यापूर्वी आरबीआयने सलग ३ वेळा रेपो दर कमी केला होता, मात्र यावेळी मात्र रेपो रेट मध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांच्यादृष्टीने रेपो रेट (Repo Rate RBI ) महत्वाचा असतो. त्यामुळे अनेकांचं लक्ष्य या रेपो रेट कडे असते. आरबीआयने यापूर्वी फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये रेपो रेट मध्ये कपात केली होती. जून महिन्यात तर तब्बल रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५० टक्के करण्यात आला होता. आताही रेपो रेट आणखी कमी होईल असा अंदाजज बांधला जात होता. मात्र आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. अलीकडच्या काळातील महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले.

जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के- Repo Rate RBI

संजय मल्होत्रा यांनी म्हंटल कि, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) इन्फ्लेशन (किरकोळ महागाई) २०२६ च्या आर्थिक वर्षात ३.१% इतकी राहील तर किरकोळ महागाई आर्थिक वर्ष २७ साठी ४.९% असा अंदाज आहे. तसेच आर्थिक वर्ष 2026 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीसाठी तो 6.5 टक्के ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी तो 6.7 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीसाठी 6.3 टक्के ठेवण्यात आला आहे.