महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक; पहिल्या स्थानी कोण?

maharashtra chitrarath
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 26 जानेवारीला देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील पथसंचलनात सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला (Maharashtra Chitrarath 2023) दुसरा क्रमांक मिळाला आहे. एकूण 17 राज्यांनी चित्ररथ सादर केला होता त्यामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक, महाराष्ट्र दुसरा आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

यंदाचा महाराष्ट्राचा चित्ररथ साडेतीन शक्तीपिठे आणि स्त्रीशक्तीचा जागर’ या थिमवर साकारण्यात आला होता. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवीचा समावेश होता . तसेच या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. या चित्ररथाच्या माध्यमातून नारी शक्तीचे दर्शन कर्तव्यपथावर सादर करण्यात आले होते.

दरम्यान , भारत हा देश सर्व जातीधर्म, वेगवेगळ्या भाषा, लोकांची वेशभूषा , तात्यांचे राहणीमान याने नटलेला आहे. प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर 17 राज्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन दाखवणारे चित्ररथ सादर केले होते. कर्तव्यपथावरील संचलनात भाग घेणारी विविध राज्य व मंत्रालये सर्वोत्कृष्ट संकल्पनांची निवड करतात. आणि दर्शकांना मंत्रमुग्ध करतात. महाराष्ट्राचा यंदाचा चित्ररथही असाच मंत्रमुग्ध करणारा होता.