प्रजासत्ताक दिन विशेष | आपण दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन का म्हणले जाते? हे अनेकांना माहिती नसते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणे आहोत प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? आणि त्यामागचा इतिहास काय आहे त्याबद्दल.
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन झाली तो दिवस. पण प्रजेची सत्ता स्थापन होणे म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर प्रजेची सत्ता स्थापन होणे म्हणजे अशी लोकशाही स्थापन करणे जिथे प्रजा हीच राजा असेल. प्रजेच्या हिताचे राष्ट्र उभारणे आणि देश कोणी चालवायचा?, देशाचा कारभार कसा चालायला हवा? कोणते कायदे बनवायला हवेत? हे सार प्रजाच ठरवत असते.
भारताच्या बाबतीत २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजेची सत्ता स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान आपण स्वीकारले आणि देशाचा कारभार कोण आणि कसा चालवणार? देशाचे कायदे काय असावेत हे ठरवलं. संविधान भारतीय जनतेला मध्ये ठेवूनच लिहिलं गेलं आणि म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सन म्हणून देशभर साजरा केला जातो.
इतर महत्वाचे –
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…
आणि भगतसिंहांना फाशीची शिक्षा देण्यात आली
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे कणखर नेतृत्व : लोकमान्य टिळक




