पाथरीत शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

0
48
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | पाथरी तालूक्यातील जवळा झुटा येथे सध्या शेतरस्त्याचे कच्चे काम चालू आहे. हा रस्ता होत असताना मात्र गावात वाद सुरु झालाय. शेतरस्ताचे चुकीच्या पध्दतीने खोदकाम केल्याने एका शेतकऱ्याने पाथरी तहसीलदार यांना लेखी तक्रार केलीय.

तालुक्यातील जवळा झुटा येथील तरूण शेतकरी बद्रीनाथ शेळ्के यांच्या गट क्रं 216 मधील शेतातुन नव्याने होत असलेला कच्चा शेतरस्ता जेसीबी यंत्राने केला जातोय. सदरील शेतरस्ता करण्यापुर्वी सर्व शेतकरी यांची परवानगी घेण आवश्यक असताना तसे नकरता जास्त रुंदी ठेवत चुकीच्या पद्धतीने शेतातून रस्ता नेल्याचा शेतकरी बद्रीनाथ शेळके यांच म्हणने आहे.

सदरील बाब सरपंच व ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली असता काहीनी दमदाटी केल्याने शेवटी तहसीलदार यांना लेखी निवेदन देत शेतरस्त्याचे काम तात्काळ थांबण्याची मागणी करण्यात आलीय .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here