लज्जास्पद! वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे बाप लेकीच्या अत्यंत पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना परभणी जिल्ह्यातील किन्होळा येथे घडली असून वडिलांनीच स्वतःच्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचे घृणास्पद कृत्य केलयं. नराधम पित्याला न्यायालयाने आता दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या किन्होळा या गावातील दीपक संपत वावळे असे आरोपीचे नाव आहे. शनिवार … Read more

फेसबुक वर बदनामीकारक जातीयवादी पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे फेसबुक वरील वॉलवर विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे एका पक्षाच्या ता. उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक समाज माध्यमावर बाळू कोल्हे पाटील नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाचा पाथरी तालुका उपाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीने शुक्रवार दुपारी दोन ते पाच च्या दरम्यान … Read more

वरुणराजाच्या जोरदार आगमनाने परभणी जिल्हा सुखावला!

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी शहरसह जिल्हामध्ये रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या पाऊसाने जिल्ह्यात सर्वदूर जोरधार पडत पाणी पाणी केलयं. यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, पाऊस झाला आहे. झालेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका, जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणाऱ्या वाहतुकीवर झाला असून, परभणी – जिंतूर आणि परभणी – गंगाखेड रोडच्या रखडलेल्या … Read more

पिसाळलेल्या वानराच्या हल्यात महिला गंभीर जखमी; वनविभागाचा हलगर्जीपणा भोवला !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने  मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून  बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने  कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे . पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या  टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव … Read more

नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी परभणी जिल्ह्यात हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात हुमणी किडींचे भुंगेरे मोठ्या संख्येने सायंकाळच्या वेळेला दिसून येत आहेत. त्यामुळे भुंगेऱ्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर या वर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे क्रमप्राप्त झाले असून शेतकऱ्यांनी हुमणी भुंग्यांसाठी वेळीच नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी … Read more

परभणीत पुन्हा दोन कोरोना बाधीत सापडले; पाथरी तालुक्यानेही खाते उघडले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी उशिरा आलेल्या अहवालामध्ये दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यातील एक रुग्ण आतापर्यंत निरंक असणाऱ्या पाथरी तालुक्यातून असल्यामुळे आता हा तालुका कोरोनाग्रस्तांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. परभणीतील मिलिंद नगर एक व पाथरी तालुक्यातील रामपुरी रत्नेश्वर येथील एक महिला कोरोनाबाधीत रुग्ण असल्याचा अहवाल आला … Read more

गोदावरीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू ; परभणीतील दुर्देवी घटना

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील गोदावरी पात्रात मध्ये आज झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये हे दोघा बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे ही दुर्घटना घडली आहे . मर्डसगाव येथील दोन बालके सकाळी अकराच्या सुमारास गोदावरी पात्रातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कृषी पंपाच्या पाणी उपसण्यासाठी खोदण्यात आलेल्या नदीपात्रातील … Read more

धक्कादायक ! परभणीत दोन दिवसाचे स्त्री अर्भक झाडाझुडपात फेकले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे गावच्या बाहेर असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये सोमवारी सायंकाळी दोन दिवसाचे स्त्री अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेगाव येथील गाव शेजारी असणाऱ्या पांदण रस्त्याच्या परिसरात सोमवार १८ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मोकळ्या … Read more

महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावली ! पाथरीतुन ९७ मजुर मायदेशी निघाले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे करमाड रेल्वे दुर्घटनेनंतर रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सोमवारी  सकाळी परभणी जिल्ह्यातील पाथरी बस्थानकातून तालुक्यातील ९७ मजुरांना घेऊन महामंडळा च्या तीन बसेस रवाना झाल्या. यावेळी दिड महिन्याच्या लॉक डाऊन नंतर गावाकडे जाण्याचा ओडीमध्ये असणाऱ्या या मजुरांना महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावल्याची भावना निर्माण … Read more

परभणीत वाळू माफिया निर्ढावले ! तहसीलदारावर केला प्राणघातक हल्ला

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीपात्रात  अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाकडून प्रयत्न करण्यात येतोय .आज दुपारी असाच प्रयत्न करणाऱ्या  पाथरी तहसीलदारांच्या पथकावरच निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी हल्ला चढवण्याचा प्रकार घडला असून नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केल्यानंतर तहसीलदार आणि वाळू … Read more