संशोधन समाजासोबत जोडता यायला हवं – गणपती रामनाथ; ‘वायसी’मध्ये भौतिकशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उदघाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे फिजिक्स विभागाने आयोजित केलेल्या तीन दिवशीय “मल्टी फंक्शनल अँड हायब्रीड मटेरियल फॉर एनर्जी अँड एन्व्हायरमेन्ट” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन शास्त्रज्ञ प्रोफेसर गणपती रामनाथ यांच्या हस्ते झाले.

अमेरिकेतील मटेरिअल रिसर्च सेंटर ट्रॉय न्यूयॉर्क येथील शास्त्रज्ञ प्रोफेसर गणपती रामनाथ यांनी आपल्या भाषणात सर्व शास्त्रज्ञ व संशोधकांना आपले संशोधन समाज आणि मानव्य विद्याशाखांबरोबर जोडण्याचे आवाहन केले. आज फक्त एका विषयाचा अभ्यास करणे पुरेसे नसून आंतरविद्याशाखीय अभ्यास करण्याची आणि हे संशोधन समाजासाठी उपयोगात आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेची वाटचाल तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर इनव्हेन्शन इनोव्हेशन अँड इनक्यूबेशन या महितीपटांनी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. जी. कानडे यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचे उद्दिष्ट आपल्या प्रस्ताविकामध्ये स्पष्ट केले.

un (57)

टाटा टेक्नॉलॉजीचे ग्लोबल डायरेक्टर पुष्कराज कौलगुड यांनी इंडस्ट्री आणि अकडेमी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होण्याची गरज अधोरेखित केली. प्रोफेसर पंडित विद्यासागर माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांनी परिषदेसाठी शुभेच्छा देताना अशा परिषदांमुळे इंडस्ट्री आणि अकडेमी यांच्यात सहजसबंध निर्माण होतात आणि ज्ञानाची समाजोपयोगी देवाणघेवाण होते असे प्रतिपादन केले.

या परिषदेला डॉ. चि संग आन ( साऊथ कोरिया) , डॉ. सी याँग चो (मियोंग युनिव्हर्सिटी, साऊथ कोरिया), डॉ. दिनेश अंमळनेरकर ब्रेनपुल सायंटिस्ट ,साऊथ कोरिया, डॉ. राजीव जोशी ( सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका, गुलबर्गा) , प्रोफेसर पी. एन. वासंबीकर, (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर , डॉ. यु . पी. मुळीक ( आर.आर.आय.डी. सातारा), प्रोफेसर डॉ वनिता कारंडे, प्रोफेसर डॉ विश्वास देशपांडे, डॉ. डी. आर. हसबे, प्रा. व्ही. आर. धायगुडे, डॉ. एस. आर. भोंगळे यावेळी उपस्थित होते. या परिषदेसाठी जगभरातून आलेल्या दोनशे वीस निबंधाच्या अबस्ट्रॅक्टचे सोव्हिनिअर यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला

जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसच्या दहशतीत! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी

Leave a Comment