एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संशोधक विद्यार्थी RRC पासून वंचित राहू नये – अभाविप

औरंगाबाद – मागील वर्षी हजारो विद्यार्थी विद्यापीठाची PhD साठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले असून जवळपास एक वर्ष कालावधीने RRC होत आहे. मात्र सद्या महाराष्ट्रात ST महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस व्यवस्था बंद आहे. RRC साठी महाराष्ट्र भरातून विद्यार्थी येणार आहेत.

परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे RRC ला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी RRC ला उपस्थित न राहू शकल्यास त्याची संशोधनाची दारे बंद होतील ही अतिशय गंभीर बाब आहे . विद्यार्थी हित लक्षात घेता PHD करू इच्छिणाऱ्या व पात्रता असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची RRC होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहतूक समस्येमुळे अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यानसाठी RRC साठी वेळ द्यावा व पुढील तारीख देण्यात यावी.

एकही विद्यार्थी संशोधनापासून वंचित राहणार नाही याची दखल घेण्यात यावी.अन्यथा या अपरिमित नुकसानास पूर्णपणे विद्यापीठ जबाबदार राहील. ही रास्त मागणी मान्य न झाल्यास अभाविप संशोधक विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करेल. असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी महानगरमंत्री नागेश गलांडे, सहमंत्री दीपक टोनपे, सोबिया शेख, रणजित खटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.