प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा!! SC, ST, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. SC , ST , ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हि यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकर यांनी याबद्दल घोषणा केली आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी वर्सेस मराठा हा श्रीमंत मराठ्यांनी लावलेला वाद आहे. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलनाची सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला केला आहे. सामंजस्याने तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नाही असेही आंबेडकरांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, काही ओबीसी संघटनांची मागणी होती की आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतोय ती गावो गावी गेली पाहिजे. त्यामुळे, या सामाजिक संघटनांना घेऊन 25 तारखेला दादर चैत्यभूमी येथून आपण आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करणार आहोत. 26 जुलै या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्यामुळे त्याच दिवशी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रेचला सुरुवात होईल. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यात ही यात्रा निघणार आहे. यानंतर 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेची सांगता होईल अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.