RBI ने 3 बँकांना ठोठावला एकूण 23 लाखांचा दंड, या कारवाई मागील कारण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तीन सहकारी बँकांवर एकूण 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये मोगवीरा सहकारी बँक लिमिटेडवर 12 लाख रुपये, इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर 10 लाख रुपये आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रीय बँकेने विविध नियमांचे पालन न केल्यामुळे या सर्व सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

मोगवीराने फंड पूर्णपणे ट्रांसफर केला नाही
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, मोगविरा सहकारी बँक लिमिटेडच्या तपासणीत असे आढळले की, बँकेने हक्क न दाखविलेले डिपॉझिटस (Unclaimed Deposits) पूर्णपणे डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेयरनेस फंड (DEA Fund) कडे ट्रांसफर केलेले नाहीत. त्याशिवाय सहकारी बँकेने निष्क्रिय खात्यांचा वार्षिक आढावा घेतला नाही. त्याचबरोबर खात्यांमधील जोखीम वर्गीकरण (Risk Categorization) करण्यासाठी बँकेने वेळोवेळी पुनरावलोकनाची कोणतीही व्यवस्था ठेवली नाही. तसेच केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की, बँकेत असे बरेच ग्राहक आढळले आहेत, ज्यांच्याकडे अनेक यूनिक कस्‍टमर आईडेंटिफिकेशन कोड्स (UCICs) आहेत. त्याच वेळी, बर्‍याच ग्राहकांचे यूसीआयसी समान असल्याचे आढळले आहे. या चुकांमुळे बँकेला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दोन सहकारी बँकांवर दंड आकारण्यात आला
केंद्रीय बॅंकेच्या मते, इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता असे दिसून आले की, बँकेने असुरक्षित कर्जासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. त्याशिवाय खाती जोखमीच्या वर्गवारीसाठी या सहकारी बँकेने वेळोवेळी पुनरावलोकनाची कोणतीही व्यवस्था ठेवलेली नाही. याशिवाय इतरही अनेक नियमांचे पालन बँकेने केले नाही. अशा परिस्थितीत बँकेला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. बारामती सहकारी बँकेच्या तपासणीत असे दिसून आले की, बँकेने विवेकपूर्ण इंटर-बँक (सिंगल बँक) एक्सपोजर मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे बँकेवर 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group