मुंबई प्रतिनिधी |भारतीय रिजर्व बँकेने नवीन २० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे. त्याचे फोटो आज RBIने प्रदर्शित केले आहेत. या नोटा फिकट पोपटी रंगाच्या असणार आहेत. तसेच या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नूतन गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे आहे.
RBI to issue new Rs 20 denomination banknotes
Read @ANI Story | https://t.co/21cKbB1KQL pic.twitter.com/IytRIPs2OC
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2019
पाचशे , शंभर, पन्नास, दहा या चलनाच्या नोटा बदलल्या नंतर आता रिजर्व बँकेने २० रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटेच्या दर्शनी भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र असणार आहे.तर मागील बाजूस एलोराच्या गुहांचे चित्र छापण्यात येणार आहे. तसेच नोटेचा आकार 63mmx129mm या प्रमाणत असणार आहे.
२० रुपयांच्या नोटेचे दर्शनी बाजूचे हे आहेत पैलू
नोटेच्या मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो असेल
देवनागरी लिपीत २० रुपये लिहिलेले असेल
नोटेच्या उजव्या बाजूला अशोकस्तंभाचं चिन्ह असेल.
मायक्रो लेटर्समध्ये ‘RBI’, ‘भारत’, ‘INDIA’ आणि ’20’ लिहिले असेल
आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी नोटेवर असेल
२० रुपयांच्या नोटेचे मागील बाजूचे हे आहेत पैलू
स्वच्छ भारतचा लोगो आणि घोषणाही असेल
डाव्या बाजूला नोट प्रिंटिंगचं वर्ष असेल
भाषांची यादी असेल
एलोरा गुहेचे चित्र असेल
देवनागरी लिपीत २० असा अंक असेल