औरंगाबाद : डेल्टाप्लसचा संसर्ग महाराष्ट्रासह देशभरात झपाट्याने वाढणार असे तज्ज्ञांचे म्हणणें आहे. महाराष्ट्रात डेल्टाप्लेसचे तब्बल २० हुन अधिक रूगन आहे असे आरोग्य विभाग सांगते.
आज औरंगाबाद पोलिसांना ७४ दुचाकी पोलीस वाहनात समावेश करण्यात आला. त्यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई माध्यमांशी बोलताना सांगिले कि, डेल्टाप्लसचा धोका आता वाढत आहे. यावर मुखयमंत्र्यांनी सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे. गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावण्यात येईल आणि चार वाजेपर्यंत दुकाने खुले राहतील असेही सांगितले.
दरम्यान, स्थानीय प्रशासनाकडून असा प्रकारचे कुठलाही आदेश देण्यात आलेला नाही. मात्र पालकमंत्री यांनी बोलताना निर्बंध निश्चित लागतील असा शब्द प्रयोग केला. यावरून लॉकडाऊनची शाक्यांत नाकारता येणार नाही.