Maharashtra MLC Elections| राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या 11 जागांसाठी राजकीय पक्षांचे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. या बारा उमेदवारांमध्ये महायुतीचे सर्वच म्हणजेच नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या विजयी झाल्या आहेत. (Maharashtra MLC Elections) तसेच ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. परंतु शेकापचे जयंत पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.
विजयी उमेदवारांची यादी (Maharashtra MLC Elections)
1) पंकजा मुंडे
2) परिणय फुके
3) सदाभाऊ खोत
4) अमित गोरखे
5) योगेश टिळेकर
6) शिवाजीराव गर्जे
7) राजेश विटेकर
8) कृपाल तुमाने
9) भावना गवळी
10) प्रज्ञा सातव
11) मिलिंद नार्वेकर
पराभव झालेला उमेदवार
जयंत पाटील यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.
दरम्यान,विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार उभे केले होते. यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचा समावेश होता. तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने याना संधी देण्यात आली होती. आणि अजित दादा गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात होते. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना संधी देण्यात आली होती. गुप्त मतदान असल्याने कोणाची विकेट जाणारा याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं होते.