चंद्रपूर प्रतिनिधी । चिमूर तालुक्यात रेती घाटाचा लिलाव होण्याआधीच रेती तस्कर रेती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवत आहेत. अशातच चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी रेती तस्करावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिमूर यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पथक निर्माण केले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने दि.२९/११/२०१९ ला अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या १२:३० सुमारास शंकरपुर मंडळातील चक जतेपार या घाटावर एक ट्रॅक्टर आणि एक ब्रास रेती अशा मुद्देमालासह जप्ती करून रेती तस्करावर कारवाई केली. या पथकात चंदन करमरकर तलाठी पिंपळनेरी , अमोल घाटे तलाठी मासळ (बु), वैभव कार्लेकर तलाठी खडसंगी, सिद्धार्थ कांबळे तलाठी मोटेगाव हे सर्व होते.