Tuesday, June 6, 2023

महिनाभरात वाहन नोंदणीतुन मिळाला 14 कोटींचा महसूल

औरंगाबाद | वाहनधारकांच्या आरटीओ वारीला आता ब्रेक लागला आहे. 22 जूनपासून वाहन पासिंगचे काम वाहन विक्रेत्यांकडे सोपवण्यात आले होते. यामुळे वाहनधारक वाहन विक्रेत्यांकडूनच पासिंग करून घेत असल्यामुळे त्यांना आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहिली नव्हती. परंतु वाहन नोंदणी साठी लागणारे शुल्क रोड टॅक्स ऑनलाईन आरटीओ कार्यालयात भरावे लागते.

22 जून ते 22 जुलै या महिन्यात वाहन नोंदनीमधून आरटीओ कार्यालयाला सुमारे 14 कोटीचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली. वाहन पासिंग चे काम वाहन विक्रेत्यांकडे सोपवल्या मुळे आरटीओ कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण देखील कमी झाला आहे.

कोरोना महामारी च्या काळात सार्वजनिक वाहणापेक्षा स्वतःच्या चारचाकी वाहनांकडे अनेकांचा कल वाढला होता. त्याचबरोबर दुचाकी ऐवजी चार चाकी वाहन घेण्यासाठी नागरिक पसंती देत असल्यामुळे वाहन विक्रेत्यांकडून 100 च्या जवळपास वाहनांची पासिंग होत होती. सध्या दोनशे वाहनांची नोंदणी होत असून चारचाकी तीनचाकी आणि दुचाकीसह इतर वाहनांचा समावेश असल्याची माहिती मेत्रेवार यांनी दिली.