फक्त 2500 रुपयांत बुक करा ‘ही’ Electric Bike; 156 किलोमीटर रेंज

Revolt RV400
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. वाढती मागणी पाहता गेल्या काही दिवसात मार्केट मध्ये अनेक इलेक्ट्रिक गाड्या दाखल सुद्धा झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रिव्हॉल्ट मोटर्सने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक रिव्हॉल्ट RV400 चे बुकिंग पुन्हा एकदा सुरु केले आहे. फक्त 2500 रुपयांच्या टोकन रकमेसह तुम्ही ही बाईक बुक करू शकता. त्यापूर्वी आपण जाणून घेऊया या इलेक्ट्रिक बाईकचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत…

Revolt RV400

Revolt RV400 इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीने 3.24 Kwh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरी पॅकमध्ये 3 Kw इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे क, ही बॅटरी फुल्ल चार्ज होण्यासाठी 4.5 तास लागतील. आणि एकदा पूर्ण चार्जिंग केल्यांनतर ही इलेक्ट्रिक गाडी तब्बल 156 किलोमीटरची रेंज देते. गाडीचे टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. बाईकच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, Revolt RV400 मध्ये, कंपनीने LED हेडलाइट, 4G कनेक्टिव्हिटी, फुल्ल डिजिटल LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, OTA, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत.

Revolt RV400

या इलेक्ट्रिक बाईकची (एक्स-शोरूम) किंमत 1 लाख 25 हजार रुपये आहे. तुम्ही ही बाईक दोन प्रकारे बुक करू शकता. यासाठी एकतर तुम्ही कंपनीच्या अधिकृत साइटवर जाऊन बुक करू शकता किंवा तुमच्या आसपास असलेल्या रिव्हॉल्ट डीलरशीपकडे जाऊन बुकिंग करू शकता. अवघ्या 2500 रुपयात तुम्ही हे बुकिंग करू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की या बुकिंगची डिलिव्हरी 31 मार्च 2023 पर्यंत केली जाईल.