सुशांतसिंगच्या स्मृतिदिनाशी रिया चक्रवर्तीच्या इंस्टा पोस्टचा संबंध..?; सोशल मीडियावर रंगली चर्चा

0
86
Rhea Chakraborty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. यामूळे गेल्या वर्षभरापासून ती चांगलीच चर्चेत आहे. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असा आरोप करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौकशीदरम्यान ड्रग्स प्रकरणदेखील समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. तब्बल एका महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली. यानंतर ती हळूहळू पुर्ववत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चांगलीच चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/CPYYxumHXLW/?utm_source=ig_web_copy_link

येत्या १४ जूनला सुशांत सिंग राजपूतची पहिली पुण्यतिथी आहे. त्यापूर्वीच रियाची ही पोस्ट वाचून अनेकांनी याचा संबंध सुशांतच्या पुण्यतिथीशी लावला आहे. यामुळे हि पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये रियाने लिहिले की,’प्रचंड वेदनेतून मिळते प्रचंड शक्ती’. तुम्हाला फक्त या एका गोष्टीसाठी माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. तिथे थांबावे लागेल. प्रेम, रिया. रिया चक्रवर्तीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. तिची मैत्रिण आणि व्हिजे अनुषा दांडेकरने या पोस्टवर माय गर्ल अशी कमेंट केली आहे. तर अपारशक्ती खुरानाने या पोस्टवर हार्ट इमोजी कमेंट केले आहे.

https://www.instagram.com/p/CNg2eJ_nrxs/?utm_source=ig_web_copy_link

या पोस्टवर कमेंट करीत रियाच्या एका चाहत्याने लिहिले की, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तर अन्य एकाने लिहिले की, तुम्हाला जास्त ताकद मिळो. तर आणखी एका चाहत्याने म्हटले आहे की, देवाचा आशीर्वाद असो. विनाकारण तुम्हाला खूप सहन करावे लागले.

https://www.instagram.com/p/CCnBR95HAmO/?utm_source=ig_web_copy_link

देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ताकद देवो. मात्र यातील हि कमेंट्स जास्त चर्चेत आहे. तू तर या आधीच आमचा विश्वास तोडला आहेस, अशी एक कमेंट युजरने केली आहे. तर या कमेंटवर रियाच्या एका चाहत्यांकडून, रियाला आपला विश्वास जिंकण्यासाठी आणखी एक संधी द्यायला हवी, असे प्रत्यत्तर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here