सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा

Bank FD
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून सलग तीन वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. अलीकडेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड, आयडीबीआय बँक यासारख्या बँकांच्या FD वरील व्याज दरातही वाढ झाली आहे. छोट्या आणि नवीन खाजगी बँका देखील सामान्य लोकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक दरात FD ऑफर करत आहेत.

ऑगस्टमध्ये देखील RBI ने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करून तो 5.4 टक्के केला आहे. आता अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांना असा प्रश्न सतावतो आहे की, फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का ??? चला तर मग त्याबाबत तज्ञ काय म्हणतायत ते समजून घेऊयात … Bank FD

FD में पैसा लगाने वालों के लिए खुशखबरी, इन दो बैंकों ने बढ़ा दीं ब्याज दरें | TV9 Bharatvarsh

किमान गुंतवणूक करत रहा

तज्ज्ञ सांगतात की, व्याजदरात आणखी वाढ होईल असे वाटत असल्याने गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिट्स मधील गुंतवणूक करणे तूर्तास तरी पुढे ढकलू शकतात. जर मात्र यामध्ये आणखी वाढ होईल असे नाही. त्यामुळे जर एखाद्याने सध्याच्या दरांवर अंशतः गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तरी देखील त्याला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

तीन वर्षांच्या FD वर 7.5% पर्यंत व्याज

तज्ज्ञ पुढे सांगतात की, नवीन आणि लहान खाजगी बँकां कडून आता तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्क्यांपर्यंत दर दिला जात आहे. हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या बचतीचा काही भाग लिक्विडिटी आणि व्याज उत्पन्न देणार्‍या FD मध्ये गुंतवावा. मात्र, बँकेच्या एफडीवरील व्याजावर टॅक्स द्यावा लागेल. अनेक ज्येष्ठांचे टॅक्स स्लॅब कमी असतात, त्यामुळे त्यांचे एकतर कर दायित्व कमी असते किंवा अजिबात नसते. अशा परिस्थितीत एफडी FD करणे फायदेशीर ठरेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

प्रमुख बँकांच्या FD चे दर

हे लक्षात घ्या कि, फिक्स्ड डिपॉझिट्सवर मिळणारे व्याज हे अनेक घटकांवर अवलंबून असते. ज्यामध्ये गुंतवलेली रक्कम, वेळ, व्याजदर आणि टॅक्स यांचा समावेश होतो. FD कॅल्क्युलेटर वापरून गुंतवणुकीवर रिटर्न मोजू शकता. Bank FD

SBI FD rates

2.90% ते 5.65% (सामान्य नागरिकांसाठी)
3.40% ते 6.45% (ज्येष्ठ नागरिकांसाठी)

IDBI Bank FD rates

2.70% ते 5.75% (सामान्य नागरिकांसाठी)
3.20% ते 6.50% (ज्येष्ठ नागरिकांसाठी)

Fixed Deposit (FD): If you are planning to get FD, then keep these 5 things in mind including laddering and short term FD, it will benefit more - Business League

Kotak Mahindra Bank FD rates

2.50% ते 5.90% (सामान्य नागरिकांसाठी)
3.00% ते 6.40% (ज्येष्ठ नागरिकांसाठी)

HDFC Bank FD rates

2.75% ते 6.10% (सामान्य नागरिकांसाठी)
3.25% ते 6.60% (ज्येष्ठ नागरिकांसाठी)

ICICI Bank FD rates

2.75% ते 6.10% (सामान्य नागरिकांसाठी)
3.25% ते 6.60% (ज्येष्ठ नागरिकांसाठी)

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page

हे पण वाचा :

Multibagger Stocks : ‘या’ 5 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील महिन्यात मिळणार बोनस शेअर्स !!!

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी !!!

ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा

Asia Cup मध्ये भारताच्या ‘या’ 5 फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा !!!

Business Idea : वर्षभर मागणी असलेल्या ‘या’ ड्रायफूटची लागवड करून मिळवा करोडो रुपये !!!