Rishabh Pant Suspended : रिषभ पंतचे निलंबन; BCCI ची मोठी कारवाई, कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मधून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली कपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवर BCCI मोठी कारवाई केली आहे. रिषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित (Rishabh Pant Suspended) करण्यात आलं आहे. स्लो ओव्हर रेटमुळे पंतला हि शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे पंत दिल्लीकडून पुढील सामना खेळू शकणार नाही. दिल्लीची पुढील मॅच १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होणार असून संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार पंतवर कारवाई – Rishabh Pant Suspended

७ मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये सामना झाला होता. या लढतीत दिल्लीला निर्धारीत वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. दिल्लीला निर्धारित २० ओव्हर पूर्ण करण्यासाठी १० मिनिटे अतिरिक्त वेळ लागला. यापूर्वी दिल्लीच्या संघाकडून २ वेळा अशीच चूक झाली होती, आता तिसऱ्यादा धीम्या गतीने ओव्हर टाकल्याबद्दल आयपीएलच्या आचारसंहितेनुसार कर्णधार म्हणून रिषभ पंतवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पंतला ३० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याशिवाय संघातील सर्व खेळाडू इम्पॅक्ट खेळाडूसह सर्वांना प्रत्येकी १२ लाख रुपये किंवा मॅच फ्रीच्या ५० टक्के यातील जी रक्कम कमी असेल तितका दंड करण्यात आला आहे.

पंत आणि संघाला वाचवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने रेफ्रींच्या या निर्णयाविरोधात बीसीसीआय लोकपालाकडे अपील सुद्धा केले होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लोकपालने सुनावणी घेतली आणि नंतर मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितले. दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. त्यातच अशा महत्वाच्या वेळी रिषभ पंतला निलंबित (Rishabh Pant Suspended) करण्यात आल्याने दिल्ली कपिटल्स साठी हा जबर धक्का मानला जात आहे.