हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काका आणि पुतण्याचं नातं कसं असायला पाहिजे याच उदाहरण देत अभिनेते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला आहे. विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रितेश देशमुख यांनी आपल्या भाषणात विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दिलीप देशमुख यांनी आपल्याला कशी साथ आणि सोबत दिली हे सुद्धा सांगितलं. आपल्या भाषणावेळी रितेश काही काळ भावुक सुद्धा झाले. भर स्टेजवरच वडिलांच्या आठवणीत ते ढसाढसा रडू लागले. यावेळी त्यांचे बंधू आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी रितेश याना सावरलं.
रितेश देशमुख म्हणाले, साहेबांची उणीव कायम भासते. पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले. याच्यासाठी उभे राहिले की, आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि नसली तरीही मी आहे. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, आज मी सर्वांसमोर सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं उदाहरण आज या स्टेजवर आहे. असं म्हणत रितेश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश झाले भावुक –
आज पुन्हा एकदा विलासराव देशमुखांच्या (Vilasrao Deshmukh) आठवणीत रितेश देशमुख भावुक झालेले पाहायला मिळाल. आज साहेबाना जाऊन १२ वर्ष झाली असं म्हणतात त्यांचा कंठ दाटून आला आणि भर भाषणात रितेश देशमुख ढसाढसा रडू लागले. यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावरून भाषण पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं. दोन भावांमधील प्रेम सुद्धा यावेळी उपस्थितांना दिसलं.
मी आहे तिथेच बरा आहे – अमित देशमुख
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्याबाबत सुद्धा चर्चा सुरु होत्या. मात्र आज अमित देशमुख यांनी या सर्व गोष्टींचे खंडन केलं. विलासराव देशमुख यांचे नाव आठवलं तर निष्ठा हे समीकरण कायम आहे. ”मला तुम्ही काँग्रेसमधून काढून टाकलं तरी माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार”, हे विलासराव देशमुख म्हणायचे. मला ही विचारात आहेत, मात्र मी जेथे आहे, तेथे ठीक आहे. समाजाची नाळ तोडून इकडे-तिकडे जाणं अपेक्षित नाही असं म्हणत रितेश देशमूख यांनी माध्यमांत पसरणाऱ्या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. तसेच जनतेला पवार ठाकरे आणि गांधी परिवाराकडून अपेक्षा आहेत असेही अमित देशमुख यांनी म्हंटल.